सचिन ते विराट! List A मध्ये सर्वाधिक धावा करणारे आघाडीचे ५ फलंदाज

सचिनने गाठलेला हा पल्ला विराटसाठी अशक्यच

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. 

१९८९ ते २०१२ या कारकिर्दीत ५५१ लिस्ट-ए सामन्यात  तेंडुलकरनं ६० शतके आणि ११४ अर्धशतकासह २१९९९ धावा केल्या आहेत.

विराट कोहलीनं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील शतकी खेळीसह १६००० धावांचा पल्ला गाठला. पण इथं सचिनला मागे टाकणे शक्यच नाही. 

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये कोहलीनं ३३४ सामन्यात १६१३० धावा केल्या असून यात ५८ शतके आणि ८४ अर्धशतकांचा समावेश आहे.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीनं ४३७ सामन्यात  ४१.३२ च्या सरासरीसह ३१ शतके आणि ९७ अर्धशतकांच्या मदतीने १५६२२ धावा केल्या आहेत. 

राहुल द्रविडने  ४४९ लिस्ट-ए सामन्यातील ४१६ डावात २१ शतक आणि११२ अर्धशतकाच्या मदतीने १५२७१ धावा केल्या आहेत.

रोहित शर्मानं लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ३५१ सामन्यातील ३३९ डावात ४७.३२ च्या सरासरीसह १३९१३ धावा केल्या आहेत. 

 रोहितच्या नावे लिस्ट ए मध्ये  ३७ शतके आणि ७४ अर्धशतकांची नोंद आहे.

Click Here