सूर्या ते गिल! T20I मध्ये मेडन ओव्हर खेळणारे ९ भारतीय फलंदाज 

टॉपला कोण? जाणून घ्या खास रेकॉर्ड

T20I मध्ये स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ईशान किशनसह यशस्वी जैस्वाल अन् शिवम दुबेनं प्रत्येकी एक निर्धाव षटक खेळले आहे.

युवा विकेट किपर बॅटर ध्रुव जुरेल याच्या नावेही आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एक मेडन ओव्हर खेळल्याची नोंद आहे.

मैदानाच्या कानाकोपऱ्यात फटकेबाजी करण्यात माहिर भारतीय टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने २०२३ मध्येएक षटक निर्धाव खेळून काढले होते. 

भारतीय टी-२० संघाचा उप कर्णधार शुबमन गिलनंही २०२३ मध्येच एका सामन्यात निर्धाव षटक खेळल्याचे पाहायला मिळले होते. 

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणरा हिटमॅन रोहित शर्मानं २०१८ मध्ये एक षटक निर्धाव खेळून काढल्याचे पाहायला मिळाले होते. 

भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याने आपल्या टी-२०I कारकिर्दीत दोन मेडन ओव्हर खेळल्याचा रेकॉर्ड आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ निर्धाव षटके खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत लोकेश राहुल सर्वात आघाडीवर  असल्याचे दिसते. 

Click Here