टॉप ५ मध्ये दोन भारतीय अन्...
आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतकांचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.
त्यापाठोपाठ या यादीत किंग कोहलीचा नंबर लागतो. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ८२ शतके झळकावली आहेत.
इथं एक नजर टाकुयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानात खेळताना सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांच्या रेकॉर्डवर
डेविड वॉर्नरनं आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन मैदानात खेळताना ३१ शतके ठोकल्याचा विक्रम आहे.
इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुट ३४ शतकांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनं आपल्या कारकिर्दीत घरच्या मैदानात खेळताना ३६ शतके झळकावली आहेत.
विराट कोहलीनं भारतीय मैदानात ३८ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
घरच्या मैदानात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रमही सचिनच्या नावेच आहे. त्याने भारतीय मैदानात ४२ शतके ठोकली आहेत.