मोहम्मद सिराज हा भारतीय क्रिकेटला मिळालेला एक हिरा आहे.
झुंजार स्वभाव : सिराजने खडतर परिस्थितीतून वर येताना कधीही हार मानली नाही. लहानपण गरिबीत गेले, पण त्याच्या इच्छाशक्तीने त्याला स्टार बनवलं.
कौटुंबिक जिव्हाळा : आपल्या कुटुंबावर सिराजचे खूप प्रेम आहे. वडील रिक्षाचालक होते आणि त्याच्या क्रिकेट यशात कुटुंबाची भूमिका अतिशय महत्त्वाची होती.
आत्मविश्वास : सिराज बहुतेक काळ प्रशिक्षकांशिवाय स्वतःच्या सराव करून क्रिकेट शिकला. सुरुवातीला टेनिस बॉल क्रिकेट खेळून गोलंदाजीची शैली विकसित केली.
स्वाभिमानी : मैदानावर सिराजला वर्णद्वेषाचाही सामना करावा लागला. मात्र तो संयम पाळत जिद्दीनं भारतासाठी खेळत राहिला.
भावनाप्रधान : मैदानात विकेट मिळाली किंवा कुटुंबीयांच्या आठवणी ताज्या झाल्या की, तो भावूक झालेला आपण पाहिला आहे. वडिलांचा मृत्यू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झाला तेव्हा देखील तो टीमसाठी उभा राहिला.
स्पर्धात्मक प्रकृती : सिराज प्रत्येक सामन्यात परिवार, गाव, देशाचा सन्मान जपण्यासाठी शंभर टक्के मेहनत करतो. प्रतिस्पर्धी फलंदाजावर आपली छाप पाडतो.
विनम्रता : मोठ्या स्टार्ससोबत खेळताना त्यांचा सल्ला घेतो, आणि आपल्याला अजून शिकायचं आहे, हे कायम मान्य करतो. ग्राऊंडेड राहणं हा एक चांगला गुण त्याच्यात आहे.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व : त्याचा प्रवास इतर सामान्य कुटुंबातील, तसेच संघर्ष करणाऱ्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे. "स्वप्न मोठं बघा, मेहनत करा," हे तो म्हणतो.
धाडसी : मोठ्या आणि महत्वाच्या क्षणांमध्ये तो धाडस दाखवतो, जास्त प्रेशरमध्येसुद्धा तो शांत राहतो. विरोधी संघावर तुटून पडतो. ओवल कसोटीत हे सर्वांनी पाहिलं.
क्षमतेवर विश्वास : सिराजला आपल्या गोलंदाजीवर पूर्ण विश्वास आहे. तो लवकर हार मानत नाही. त्यामुळेच कसोटी, वनडे, टी-२० सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याला यश मिळत आहे.