सिराजनं साधला मोठा डाव; स्टोक्स अन् बुमराहला टाकलं मागे

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

मोहम्मद सिराज याने ओव्हलच्या मैदानातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात मोठा डाव साधला आहे.

इंग्लंडच्या पहिल्या डावात चार विकेट्सचा डाव साधताना ओली पोप आणि हॅरी ब्रूकसह जो रुटलाही त्याने तंबूचा रस्ता दाखवला.

या कामगिरीसह बेन स्टोक्स अन् बुमराहला मागे टाकत तो अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय.

सिराजच्या खात्यात १८ विकेट्स जमा झाल्या असून शेवटच्या डावात यात आणखी भर घालत कसोटीत सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याची त्याला संधी आहे.

२०२४-२५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने  एका मालिकेत २० विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. इंग्लंड दौऱ्यात तो यात सुधारणा करु शकतो. 

भारत-इंग्लंड यांच्यातील मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बेन स्टोक्सनं १७ विकेट्स घेत दुसऱ्या स्थानी आहे.


इंग्लंडच्या ताफ्यातील जॉश टंग हा १५ विकेट्स घेत या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 


जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध ३ कसोटी सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत.

Click Here