इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
ओव्हल कसोटी सामन्यात हातून निसटलेला सामना जिंकून देण्यात मोहम्मद सिराजनं मोलाचा वाटा उचलला.
अखेरच्या दिवशी ३५ धावांचा बचाव करताना ४ पैकी ३ विकेट्स घेत तो ओव्हलच्या मैदानातील टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.
मॅच विनिंग विकेट घेत त्याने पाच विकेट्सचा डावही साधला. एवढेच नाही तर त्याने कपिल पाजींचा विक्रम मागे टाकला आहे.
इंथ एक नजर टाकुयात इंग्लंडमध्ये कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांवर
इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहे. त्याने इथं ५१ विकेट्स घेतल्या आहेत.
इशांत शर्मानंही इंग्लंडच्या मैदानात ५१ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सिराज ४६ विकेट्स घेत या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
कपिल देव यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत इंग्लंडच्या मैदानात ४३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.
मोहम्मद शमीनं इंग्लंडच्या मैदानात ४२ विकेट्स घेतल्या आहेत.