एका डावात सर्वाधिक षटकार! मोर्कोनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

टेस्टमध्ये कमालीची कामगिरी 

गुवाहाटीच्या कसोटीत मार्को यान्सेन याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले. पण उत्तुंग फटकेबाजीसह विश्वविक्रमाला गवसणी घातली.

कसोटीत नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका डावत सर्वाधिक ७ षटकार मारत त्याने नवा विक्रविक्रम आपल्या नावे केला.

याआधी झिम्बाब्वेच्या अँडी ब्लिग्नॉट याने २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाउन कसोटीत ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ६ षटकार मारले होते. 

एवढेच नाही तर टीम इंडियाविरुद्ध भारतीय मैदानात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आता त्याच्या नावे झाला आहे.

गुवाहाटच्या मैदानातील स्फोटक फलंदाजीत त्याने एका डावात ७ षटकार मारत दोन दिग्गजांना मागे टाकले आहे. 

वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर व्हिव्ह रिचर्ड्स यांनी १९७४ मध्ये दिल्ली कसोटीत एका डावात ६ षटकार मारले होते. हा रेकॉर्ड त्याने मोडीत काढला.

ऑस्ट्रेलियन दिग्गज मॅथ्यू हेडनं याने २००१ मध्ये चेन्नई कसोटीत एका डावात सर्वाधिक ६ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. 

Click Here