पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकून देशाचे नाव उंचावणारी नेमबाज मनु भाकर आता नवी इनिंग सुरु करणार आहे.
रोहतकच्या IIM मधून ती क्रीडा व्यवस्थापनात MBA करणार आहे आणि खेळांशी संबंधित व्यवसाय समजून घेणार आहे.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश कसा मिळवायचा आणि यातून कुठल्या पदांसाठी नोकरी मिळते, जाणून घेऊया.
अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पदवी असणे आवश्यक असून CAT, MAT किंवा XAT सारख्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.
काही कॉलेज परीक्षांच्या गुणांवरून प्रवेश देतात, तर काही ग्रुप डिस्कशन व मुलाखती देखील घेतात.
भारतात हे अभ्यासक्रम सिम्बायोसिस स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्सेस- पुणे, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ- नवी मुंबई, SRM विद्यापीठ- चेन्नई येथे दिले जातात.
यामध्ये इंटर्नशिप दिली जाते. या अभ्यासक्रमाची फी २४,००० ते २० लाख रुपयांपर्यंत असू शकते.
कोर्स केल्यानंतर तुम्हाला स्पोर्ट्स मॅनेजर, पीआर एक्झिक्युटिव्ह किंवा स्पोर्ट्स मार्केटर म्हणून नोकरी मिळते.
सुरुवातीला, स्पोर्ट्स मॅनेजरचा सरासरी पगार दरवर्षी सुमारे ५.६ लाख रुपये असू शकतो, जो नंतर वाढत जातो.