फिल्डिंगवेळी दुसऱ्यांदा साधला हा डाव
LSG विरुद्धच्या सामन्यात KKR कडून रिंकू सिंह याने संघाचा डाव सावरताना IPL मधील सर्वोच्च धावसंख्येचा खास विक्रम आपल्या नावे केला.
फलंदाजीशिवाय त्याने क्षेत्ररक्षणात दुसऱ्यांदा विक्रमी 'चौकार' मारत नवा इतिहास रचला आहे.
लखनौच्या मैदानात त्याने ४ झेल टिपले. आयपीएलच्या इतिहासात KKR कडून एका डावात दुसऱ्यांदा त्याने अशी कामगिरी करुन दाखवली.
याआधी २०२२ च्या हंगामात रिंकून गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात एका डावात ४ झेल टिपले होते.
IPL मध्ये KKR कडून सर्वाधिक दोन वेळा ४ झेल टिपण्याचा खास विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे.
त्याच्याशिवाय जॅक कॅलिस याने २०११ च्या हंगामात डेक्कन चार्जर्स विरुद्ध एका डावात ४ झेल घेतल्याचे पाहायला मिळाले होते.
Your Page!