रोहित ते सूर्या! जाणून घ्या खास रेकॉर्ड
२०२६ मध्ये भारतीय संघाला सलग दुसरे जेतेपद मिळवून देणारा सूर्यकुमार गत हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा भाग होता.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह देखील २०२४ च्या हंगामातील वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा भाग होता.
हार्दिक पांड्या टीम इंडियाकडून २०२४ आणि २०२६ सलग दोन वेळा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.
२०२६ चा हंगाम गाजवलेला संजू गत हंगामात टी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. पण गत हंगामात त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती.
फिरकीपटू कुलदीप यादव देखील सलग दोन टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या संघाचा सदस्य राहिला आहे.
पॉवर हिटर शिवम दुबेने भारतीय संघाला सलग दोन टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
DSP मोहम्मद सिराज यानेही २०२४ आणि २०२६ च्या हंगामातील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य राहिला आहे.
अक्षर पटेल यानेही सलग दोन हंगामात आपल्या अष्टपैलूत्वाची झलक दाखवून देत खास कामगिरी आपल्या नावे नोंदवली आहे.
टी-२० क्रिकेटमधील भारताचा नंबर वन गोलंदाज अर्शदीप सिंग हा देखील बॅक टू बॅक वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मोजक्या खेळांडूपैकी एक आहे.
गत वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार रोहित शर्मा २०२४ च्या हंगामाआधी २००७ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता.