प्रेम अन् मराठी मुलीच्या मनातली गोष्ट; ती सिराजसोबतच्या बाँडिंगमुळे चर्चेत 

खास शोमध्ये व्यक्त केलेली भावना

क्रिकेटर मोहम्मद सिराजसोबत स्पॉट झाल्यापासून जनाई भोसले ही सातत्याने चर्चेत आहे. 

आशा भोसले यांच्याप्रमाणेच त्यांची नात जनाई ही सुद्धा एक उत्तम गायिका आहे. एवढेच नाही तर ग्लॅमरस लूक्समुळेही ती लक्षवेधून घेते.

आमचं नातं आहे, पण भावा-बहिणीचं असं सांगितल्यावर जनाईनं क्रिकेटरसोबतच राखीचा सण साजरा केला. सिराजनं आपल्या मानलेल्या बहिणीला  खास गिफ्टही दिलं.

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर सिराजसोबत ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये आपलं लोकप्रिय गाणं गाताना दिसली अन् दोघांच्यातील नात्यासंदर्भात चर्चा रंगली.

इथं जाणून घेऊयात मधूर आवाजातील गाण्यासह सौंदर्यानं भारावून सोडणाऱ्या या चेहऱ्याच्या मनात प्रेमाबद्दल काय भावना आहेत, त्यासंदर्भातील गोष्ट

एका खास कार्यक्रमात जनाई भोसले हिने प्रेमाबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती.

 जोडीदार समजुतदार असावा, तसे नसेल तर ते नातं टिकू शकत नाही, असे ती म्हणाली होती.

Click Here