इथं पाहा टेस्टमधील बेस्ट रेकॉड
कगिसो रबाडानं पाकिस्तान विरुद्धच्या कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकवताना खास विक्रम आपल्या नावे केला.
११ व्या क्रमांकावर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्या गोलंदाजांच्या एलिट यादीत रबाडा अव्वल पाचमध्ये पोहचला आहे.
इथं एक नजर टाकुयात टेस्टमध्ये ११ व्या क्रमांकावर खेळताना कडक बॅटिंगसह सर्वोच्च धावा करणाऱ्या ५ गोलंदाजांच्या खास रेकॉर्डवर
रबाडानं ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ११६ च्या स्ट्राइक रेटसह ६१ चेंडूत ७१ धावांची दमदार खेळी साकारली.
झहीर खान याने २००४ मध्ये ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना बांगलादेशविरुद्धच्या ढाका कसोटीत ७५ धावांची खेळी केली होती.
२०१४ मध्ये जेम्स अँडरसन याने नॉटिंगहॅन कसोटीत टीम इंडियाविरुद्ध ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ८१ धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजच्या टिनो बेस्ट याने २०१२ मध्ये बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडविरुद्ध ११ व्या क्रमांकावर येऊन ९५ धावा ठोकल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाच्या ॲश्टन ॲगर याने इंग्लंडविरुद्धच्या नॉटिंगहॅम कसोटीत ११ व्या क्रमांकावर विक्रमी ९८ धावांची खेली साकारली होती.