इथं स्मृती आहे क्वीन...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेडच्या ओव्हल मैदानातील तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले.
या सामन्यात ४६ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ५९ धावांची खेळी करताना तिने खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून २५०० धावांचा टप्पा पार करणारी ती चौथी बॅटर ठरली आहे.
भारताकडून महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये स्मृती मानधानच्या नावे १६० सामन्यात सर्वाधिक ४२३१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर या यादीत १९० सामन्यात ३८२० धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
जेमिमा रॉड्रिग्ज या यादित तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. ११८ सामन्यात तिच्या खात्यात आता २५५१ धावा जमा आहेत.
शेफाली वर्मानं आतापर्यंतच्या आपल्या टी-२० कारकिर्दीत ९८ सामन्यात २५१९ धावा केल्या आहेत.
मिताली राज या यादीत पाचव्या स्थानावर आहे. तिने ८९ टी-२० सामन्यात २३६४ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.