बुमराह ते कुंबळे! 'स्टंप-तोड' गोलंदाजी करणारे ५ भारतीय

बुमराहनं मोडला अश्विनचा रेकॉर्ड

जसप्रीत बुमराहनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्सचा डाव साधताना दोघांचा त्रिफळा उडवला. 

रायन रिकल्टनच्या विकेटसह बुमराहनं बोल्डच्या रुपात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर. अश्विनला मागे टाकले. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहनं आतापर्यंत १५३ फलंदाजांना बोल्ड स्वरुपात तंबूचा रस्ता दाखवला आहे. 

आर अश्विन या यादीत १५१ बोल्ड स्वरुपातील विकेट्सच्या रेकॉर्डसह या यादीत चौथ्या स्थानावर आहे. 

रवींद्र जडेजानं  आतापर्यंतच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत  १४५ फलंदाजांना बोल्ड स्वरुपात आउट केले आहे. तो आघाडीच्या पाचमध्ये आहे. 

कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १६७ विकेट्स या बोल्डच्या स्वरुपात घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  बोल्डच्या स्वरुपात सर्वाधिक विकेट्स घेण्यात अनिल कुंबळे  १८६ विकेट्ससह सर्वात आघाडीवर आहे.

Click Here