क्रिकेटच्या पंढरीत बुमराहचा 'महारेकॉर्ड'

नावे झाला परदेशात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेण्याचा विक्रम

जसप्रीत बुमराहनं लॉर्ड्सच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच विकेट्सचा डाव साधत मोठा विक्रम आपल्या नावे केलाय.

क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात त्याने पहिल्यांदाच अशी कामगिरी करून दाखवली आहे.

जोफ्रा आर्चरचा त्रिफळा उडवत जसप्रीत बुमराह भारताकडून परदेशात सर्वाधिक वेळा 'पंजा' मारणारा गोलंदाज ठरला. 

एक नजर बुमराहसह परदेशात सर्वाधिक वेळा पाच विकेट्सचा डाव साधणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या रेकॉर्ड्वर

जसप्रीत बुमराहनं आपल्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत परदेशात १३ वेळा पाच विकेट्सचा डाव साधला आहे.

भारताचे दिग्गज अष्टपैलू कपिल देव या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत परदेशात १२ वेळा हा डाव साधला आहे. 

जम्बो अनिल कुंबळे या दिग्गज फिरकीपटूनं परदेशात  १० वेळा पाच विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

इंशात शर्मानं ९ वेळा परदेशात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. 

आर. अश्विनसह भागवत चंद्रशेखर आणि झहिर खान यांनी परदेशातील मैदानात प्रत्येकी ८-८ वेळा अशी कामगिरी करून दाखवलीये. 

Click Here