बुमराह नंबर वन! टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ भारतीय

बुमराहनं मोडला अश्विनचा रेकॉर्ड

जसप्रीत बुराहनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर ८ मधील लढतीत ३ विकेट्सचा डाव साधत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. 

बुमराहनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याऱ्या आर. अश्विनचा विक्रम मोडीत काढला. 

इथं एक नजर टाकुयात जसप्रीत बुमराहसह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आघाडीच्या भारतीय गोलंदाजांच्या खास रेकॉर्डवर.. 

जसप्रीत बुमराह ३३ विकेट्स घेत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. 

आर. अश्विन याने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत वर्ल्ड कप स्पर्धेत ३२ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

अर्शदीप सिंगही या यादीत आहे. त्याच्या खात्यात ३२ विकेट्सची नोंद असून बुमराहला तो तगडी फाईट देऊ शकतो.

हार्दिक पांड्याने आतापर्यंत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २९ विकेट्स घेतल्या आहेत. 

रविंद्र जडेजाचाही या यादीत समावेश आहे. त्याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २२ विकेट्स घेतल्या आहेत.

Click Here