२४ तासांत दुसरा शतकवीर अन् नवा विश्वविक्रम

या यादीत संजू अन् विराटचंही नाव

टीम इंडियाच्या धुरंधरांसमोर इंग्लंडच्या २२ वर्षीय जेकब बेथेलची विश्वविक्रमी खेळी व्यर्थ ठरली.

पण, वानखेडेच्या मैदानात या युवा बॅटरनं १०५ धावांच्या खेळीसह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नवा इतिहास रचला.

२४ तासांच्या आत न्यूझीलंडच्या फिन ॲलनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढत तो टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नॉकआउटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने जी धमक दाखवली ती कमाल होती. पण शेवटी इंग्लंडचा संघ ७ धावांनी कमी पडला.

फिन ॲलन याने टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी साकारली होती. 

तिलकरत्ने दिलशान या यादीत नाबाद ९६ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. २००९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ही खेळी केली होती.

विराट कोहलीनं २०१६ च्या हंगामात वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडेच्या मैदानात नाबाद ८९ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

संजू सॅमसन याने इंग्लंडविरुद्धच्या सेमीत  ८९ धावांसह या यादीत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. 

Click Here