कोणता कर्णधार ठरला सर्वात यशस्वी?
ईशान किशनच्या रुपात सनरायझर्स हैदराबादच्या संघाला २०२६ च्या हंगामात नवा कॅप्टन मिळाला आहे.
संगकारा हा SRH चा पहिला कॅप्टन. २०१३ च्या हंगामात त्याच्या नेतृत्वाखालील संघाने ९ सामन्यात ४ विजय ४ पराभवासह १ अनिर्णित अशी कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलियन कॅमेरॉन व्हाइट याने २०१३ च्या हंगामात ८ सामन्यात SRH संघाचे नेतृत्व करताना ५ विजय मिळवून दिले.
शिखर धवन याने २०१३-१४ या कालाधीत १६ सामन्यात संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ७ विजय नोंदवले.
२०१४ च्या हंगामात डॅरेन सॅमीनं ४ सामन्यात SRH संघाचे नेतृत्व केले. यात संघाला दोन विजय मिळाल्याचा रेकॉर्ड आहे.
डेविड वॉर्नर याने २०१५ ते २०२१ या काळात सर्वाधिक ६७ सामन्यात नेतृत्व करताना SRH ला २०१६ मध्ये चॅम्पियन केल्याचा रेकॉर्ड आहे.
२०१८ ते २०२२ या कालावधीत केन विल्यमसन याने ४६ सामन्यात सनराय़झर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व केले.
भुवनेश्वर कुमारनं २०१९ ते२०२३ या कालावधीत ८ सामन्यात संघाच्या नेतृत्वाछी धुरा सांभाळली होती.
मनिष पांडेनं २०२१ मध्ये एका सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते.
२०२३ च्या हंगामात एडन मार्करमनं १३ सामन्यात संघाचे नेतृत्व केले. पण तो खास छाप सोडण्यात अपयशी ठरला.
पॅट कमिन्स हा २०२४ च्या हंगामापासून गत हंगामापर्यंत ३० सामन्यात संघाचे नेतृत्व केले. यात १५ सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे.