इथं पाहा टी-२० मधील खास रेकॉर्ड
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत ईशान किशन याने नेतृत्वासह फलंदाजीतील कर्तृत्व दाखवून दिले आहे.
झारखंडच्या संघाला पहिली SMAT स्पर्धा जिंकून देताना त्याच्या भात्यातून ऐतिहासिक शतक पाहायला मिळाले.
टीम इंडियातून बाहेर पडल्यावर वार्षिक करारातूनही त्याचा पत्ता कट झाला. विक्रमी कामगिरीसह त्याने पुन्हा टीम इंडियाचे दरवाजा ठोठावला आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये शतक झळकवणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.
संजूचा विक्रम मोडीत काढत भारताकडून टी-२० मध्ये विकेट किपर बॅटरच्या रुपात सर्वाधिक ५ शतकांचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला.
विकेट किपर बॅटरच्या रुपात टी-२० मध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत क्विंटन डी कॉक अव्वलस्थानी आहे.
पाकिस्तानच्या कामरान अकमल याने आपल्या टी-२० कारकिर्दीत विकेट किपर बॅटरच्या रुपात ५ शतके झळकावली आहेत.
संजू सॅमसन याने विकेट किपर बॅटरच्या रुपात टी-२० मध्ये चार शतके झळकवल्याचा विक्रम आहे.