विराट ते ईशान! भारत-पाक टी-२० सामन्यात सर्वोच्च खेळी करणारे फलंदाज

या यादीत गंभीरचंही नाव

भारत-पाक हाय-व्होल्टेज लढतीत सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ईशान किशन आघाडीच्या फलंदाजांमध्ये पोहचला आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा किंग कोहलीच्या नावे आहे.

विराट कोहलीनं २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मेलबर्नच्या मैदानात पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची नाबाद खेळी साकारली होती. 

या यादीत विराट पाठोपाठ मोहम्मद रिझवानचा नंबर लागतो. २०२१ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दुबईच्या मैदानात त्याने नाबाद ७९ धावांची खेळी केली होती.

२०१२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोलंबोच्या मैदानात विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्ध नाबाद ७८ धावांची खेळी केली होती.

ईशान किशन याने कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात ४० चेंडूत ७७ धावांची खेळी करत चौथी सर्वोच्च धावसंख्या उभारली.

पहिल्या वहिल्या टी वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेतील जोहन्सबर्गच्या मैदानातील सामन्यात गौतम गंभीरनं पाकविरुद्ध ७५ धावांची खेळी केली होती.

Click Here