टीम इंडियाचा माजी क्रिकेटर इरफान पठाणच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. त्याने २०१६ मध्ये सफा बेग हिच्याशी लग्न केले होते.
इरफान आणि सफा यांच्यात १० वर्षांचे अंतर आहे. इरफानचा जन्म १९८४ सालचा तर सफाचा जन्म हा १९९४ साली झाला आहे.
लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इरफान पठाणे इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केली. त्यात त्याने पत्नी सफाबाबत प्रेम व्यक्त केले.
इरफानने लिहिले की, प्रेमळ गप्पांपासून सगळं सुरु झालं. तेव्हा वाटलं नव्हतं की या गप्पा कधीच न संपणाऱ्या असतील.
त्याकाळी मुलं बाळं यांचा विचार न करता आम्ही एकत्रित आमचं आयुष्य डोळ्यासमोर ठेवलं आणि येणारा दिवस छान जगलो.
आज १० वर्षानंतरही मला सफा तितकीच आवडते आणि मी कायम माझी पत्नी म्हणून तिचीच निवड करेन, असेही इरफानने लिहिले.