संजूनं केली KL राहुलची बरोबरी; MS धोनी अजूनही टॉपर

 IPL स्पर्धेतील खास विक्रम...

IPL २०२६ च्या हंगामातील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात CSK चा स्टार बॅटर संजू सॅमसनचं अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकले. 

पण या खेळीत त्याने विकेट किपर बॅटरच्या रुपात सर्वाधिक वेळा ३० पेक्षा अधिक धावा करण्याच्या KL राहुलच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

संजू सॅमसन याने १८२ सामन्यात ४६ वेळा ३० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

लोकेश राहुलनं १४९ सामन्यात विकेट किपर बॅटरच्या रुपात ४६ वेळा ही कामगिरी करुन दाखवलीये.

रिषभ पंतने आतापर्यंतच्या आयपीएल स्पर्धेत ५० वेळा ३० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. 

दिनेश कार्तिक याने आपल्या IPL कारकिर्दीत ५८ वेळा ही कामगिरी करुन दाखवली आहे.

यंदाच्या हंगामात एकही सामना न खेळलेला MS धोनी या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याने ६६ वेळा ३० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. 

Click Here