नव्या हंगामात नवा तोरा!
आरसीबीच्या संघासह किंग कोहलीची स्वप्नपूर्ती करणारा कर्णधार रजत पाटीदार पुन्हा एकदा नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.
गत हंगामात त्याने तब्बल १८ वर्षांनी RCB ला पहिली वहिली ट्रॉफी जिंकून देत नवा इतिहास रचला होता.
तो नव्या हंगामात पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची जादू दाखवण्यासाठी तयार आहे.
आयपीएलच्या १९ व्या हंगामासाठी रजत पाटीदार खास लूकमुळेही चर्चेत आहे.
क्रिकेटच्या मैदानात पहिल्याच प्रयत्नात कॅप्टन्सीत 'धुरंधर' ठरलेला चेहऱ्यानं लांब हेअर स्टाईलसह रणवीर सिंहची लूकची कॉपी केल्याचे दिसते.
दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलनं मुंबईतील खास कार्यक्रमात रजत पाटीदारचा लूक पाहून धुरंधर बॉय असे म्हणत त्याची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले.
IPL च्या इतिहासात फक्त धोनी असा कर्णधार आहे ज्याने CSK च्या संघाला बॅक टू बॅक ट्रॉफी मिळवून दिली आहे.
रजत पाटीदार धोनीसारखी कामगिरी करून दाखवत RCB ला सलग दुसरी ट्रॉफी मिळवून देणार का? ते पाहण्याजोगे असेल.