बदली खेळाडूसाठी सर्वोत्तम पर्याय
ऑस्ट्रेलियन नॅथन एलिसच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्सचे टेन्शन वाढलं आहे. तो यंदाच्या हंगामातून बाहेर पडला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ २ कोटीसह रिटेन केलेल्या या खेळाडूच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात कुणावर डाव लावणार? ही चर्चा आता रंगू लागली आहे.
इथं एक नजर टाकुयात अशा पाच परदेशी खेळाडूंवर जे बदली खेळाडूच्या रुपात CSK साठी फायद्याचा सौदा ठरू शकतील.
अफगाणिस्तानचा डावखुरा जलदगती गोलंदाज फझलहक फारूखीला IPL चा अनुभव आहे. IPL च्या १२ सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या आहेत.
द.आफ्रिकेचा जेराल्ड कोएट्झी CSK साठी उत्तम पर्याय आगहे. MI आणि GT चं प्रतिनिधीत्व केलेला हा गडी लोअर बॅटिंग ऑर्डरमध्येही उपयुक्त ठरू शकतो.
इंग्लंडचा रिचर्ड ग्लीसन दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये चेन्नई फ्रँचायझीचा भाग आहे. ३८ वर्षांच्या या गोलंदाजीवर CSK डाव लावणार का?
टी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स खात्यात असणारा ऑस्ट्रेलियन शॉन ॲबॉट हा देखील चेन्नई सुपर किंग्ससाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
इंग्लंडच्या जोश टंग यानेही आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवली असून याचाही विचार CSK च्या संघाला करता येईल.