एक OUT! फक्त दोघांच्यात शर्यत
हिटमॅन रोहित शर्मानं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात दमदार फलंलदाजी करत यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले.
यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढतीत त्याने IPL मध्ये एका फ्रँचायझी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला.
इथं एक नजर टाकुयात रोहित शर्मासह IPL मध्ये एका फ्रँचायझी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर
रोहित शर्मानं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सर्वाधिक ११६१ धावा केल्या आहेत. तो याबाबतीत टॉपर आहे.
विराट कोहलीनं पंजाब किंग्स विरुद्ध ११५९ धावा केल्या असून सुपर किंग्स विरुद्ध त्याच्या नावे ११४६ धावा करण्याचा विक्रम आहे.
डेविड वॉर्नर याने आपल्या कारकिर्दीत पंजाब किंग्सच्या संघाविरुद्ध सर्वाधिक ११३४ धावा काढल्या आहेत.
IPL मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावे असलेल्या कोहलीनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही ११३० धावा केल्या आहेत.
डेविड वॉर्नरनं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १०९३ धावा केल्या हिटमॅन रोहितनं त्याला ओव्हरटेक केल्याचे पाहायला मिळाले.
केकेआरशिवाय रोहित शर्मानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १०५७ धावा केल्याचाही रेकॉर्ड आहे.
वॉर्नर याया यादीत असला तरी अव्वलस्थानाच्या शर्यतीतून तो बाहेर पडला असून रोहित-विराट यांच्यात तगडी स्पर्धा असल्याचे दिसून येते.