मेस्सीची दिवानी! पाहा खास फोटो
फुटबॉल जगतातील दिग्गज आणि अर्जेंटिनाचा स्टार लियोनेल मेस्सीनं भारत दोऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडूंचीही भेट घेतल्याचे पाहायला मिळाले.
मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यात ज्या स्टार खेळाडूंना भेटला त्यात फिरकीपटू कुलदीप यादवचाही समावेश होता.
भारतीय महिला क्रिकेट संघातील विश्वविजेती खेळाडू रेणुका सिंह ठाकूर ही देखील मेस्सीची जबरा फॅन आहे.
ही महिला क्रिकेटर मेस्सीला फक्त भेटली नाही तर तिला फुटबॉल जगतातील सर्वोत्तम खेळाडूसोबत फोटोशूट करण्याची संधी मिळाली.
तिने मेस्सीसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. adidasindia मुळे दोन वर्ल्ड चॅम्पियन एका फ्रेममध्ये आले, अशी भावना तिने व्यक्त केली आहे.
मेस्सी स्पोर्ट्स ब्रँड adidasindia च्या खास फोटोशूटमध्ये सामील झाला होता. त्यामुळे महिला क्रिकेटरला मेस्सीसोबत झळकण्याचे स्वप्न सत्यात उतरले.