Yo Yo Test मध्ये विराटपेक्षा अधिक स्कोअर नोंदवणारे ४ भारतीय

 फिटनेस टेस्ट संदर्भातील खास गोष्ट

फक्त टीम इंडियातच नव्हे तर  क्रिकेट जगतात विराट कोहली हा सर्वात फिट क्रिकेटर आहे. 

पण तुम्हाला माहितीये का? BCCI कडून फिटनेससाठी जी यो यो टेस्ट घेतली जाते त्यात एक नव्हे तर चार जण विराट कोहलीपेक्षा भारी ठरले आहेत.

विराट कोहलीचा यो यो टेस्टमधील बेस्ट स्कोअर १९ असा आहे. पण हा काही या टेस्टमधील सर्वोच्च स्कोअर नाही. 

अंडर १९ पासून विराट कोहलीसोबत खेळणाऱ्या कर्नाटकचा बॅटर  मनिष पांडे याने यो यो टेस्टमध्ये १९.२ स्कोअर केल्याचा रेकॉर्ड आहे. 

जम्मू काश्मीरचा क्रिकेटर अहमद बंदे याने २०१८ च्या देशांतर्गत हंगामासाठी यो यो टेस्ट दिली होती. या पठ्ठ्यानं त्यावेळी १९.४ स्कोअर केल्याची नोंद आहे. 

मयांक अग्रवाल हा विराट कोहलीपेक्षा खूप पुढे आहे. २०२३ मध्ये त्याने २१.१ स्कोअरसह यो यो टेस्टमधील सर्वोच्च स्कोअरचा रेकॉर्ड सेट केलेला.

Click Here