IND vs PAK : पाक विरुद्धचा सामना सूर्यासाठी ठरेल खास, कारण...

पाक विरुद्ध कॅप्टन्सीचा खास रेकॉर्ड

आशिया कप स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना सूर्यकुमार यादवसाठी खास असेल.

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी केलीये. पाक विरुद्ध तो पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करेल. 

आतरराष्ट्रीय टी-२० त महेंद्रसिंह धोनीनं पाकविरुद्ध टीम इंडियाचे सर्वाधिक ८ वेळा नेतृत्व केले. यात ६ विजय आणि २ पराभव असा त्याचा रेकॉर्ड राहिलाय.

रोहित शर्मानं ४ टी-२० सामन्यात पाक विरुद्ध कॅप्टन्सी केलीये. यात टीम इंडियाला ३ विजयासह एका पराभवाचा सामना करावा लागलाय.

२०२१ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील एकमेव सामन्यात कोहलीनं पाक विरुद्ध कॅप्टन्सी केली. यावेळी १० विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

आशिया कप स्पर्धेतील लढतीत सूर्यकुमार यादव पाक विरुद्ध टी-२० त  कॅप्टन्सी करणाऱ्या धोनी, रोहित अन् कोहलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारेल.

पाक विरुद्ध विजय मिळवत तो अगदी दाबात दाबात ही एन्ट्री मारण्यासाठी प्रयत्नशील असेल. 

Click Here