रोहित ते संजू! T-20I मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय सलामीवीर

कुणाच्या नावे किती धावा? इथं पाहा रेकॉर्ड

 सलामीवीराच्या रुपात भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम हा हिटमॅन रोहित शर्माच्या नावे आहे. त्याच्या खात्यात ३७५० धावा आहेत.

केएल राहुलनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना १८२६ धावा केल्या आहेत.

माजी सलामीवीर शिखर धवनच्या खात्यात १७५९ धावांची नोंद आहे.

भारतीय संघाचा विद्यमान कोच अन् माजी सलामीवीर गौतम गंभीरनं टीम इंडियाकडून सलामीवीराच्या रुपात ९३२ धावा काढल्या आहेत.

युवा बॅटर यशस्वी जैस्वालनं टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करताना ७२३ धावा केल्या आहेत.

ईशान किशन याने सलामीवीराच्या रुपात ६६२ धावा केल्या आहेत. तो बऱ्याच दिवसांपासून  टीम इंडियातून बाहेर आहे.

शुबमन गिलनंही सलामीवीराच्या रुपात खास छाप सोडली असून त्याच्या खात्यात टी-२० क्रिकेटमध्ये ५७८ धावांची नोंद आहे.

विराट कोहलीनंही भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने सलामीवीराच्या रुपात ५५१ धावा काढल्या आहेत. 

संजू सॅमसन याने भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करताना ५२२ धावा केल्या आहेत. 

Click Here