कोण आहे सिक्सर किंग युवीची सावत्र बहिण? ती या गोष्टीमुळे आलीये चर्चेत

सोशल मीडियावरील लक्षवेधी चेहरा

युवराज सिंगची बहिण सध्या चांगलीच चर्चेत आहे. कोण आहे ती? अन् कोणत्या गोष्टीमुळे ती चर्चेत आलीये जाणून घेऊयात सविस्तर 

अमरजोत कौर उर्फ एमी बुंदेल ही युवराज सिंगची सावत्र बहिण आहे. 

 एमी ही माजी क्रिकेटर अन् युवीचे वडील योगराज सिंग यांची दुसरी पत्नी आणि पंजाबी अभिनेत्री नीना बुंदेर यांची कन्या.

दिसायला छान जणून सौंदर्याची खाण असणारी ही सुंदरी युवी प्रमाणेच राष्ट्रीय खेळाडू आहे.

आशिया पॅसिफिक पॅडल कप स्पर्धेसाठी भारताच्या राष्ट्रीय संघात निवड झाल्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आलीये.

एक स्पोर्ट्स पर्सनच्या रुपात करिअरला पसंती देणाऱ्या एमीनं आपल्या अदाकारीनंही मोठा चाहतावर्ग कमावला आहे.

सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती 'एक से बढकर' एक फोटो शेअर करत असते. 

फिटनेस शिवाय ती स्टाइल स्टेटमेंटमुळे सर्वांचे लक्षवेधून घेताना दिसते.

Click Here