रोहितच्या अलिशान कारसंदर्भातील गोष्ट; सर्वात महागडी कार कोणती?

अलिशान कारचा शौकीन आहे हिटमॅन

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा अलिशान कारचा शौकीन आहे. नुकतीच त्याने जवळपास ५९.८९ लाखांची  (एक्स शोरुम प्राइज) टेस्ला कार घेतली आहे. 

 इथं एक नजर टाकुयात त्याच्याकडील महागड्या अन् अलिशान कारच्या खास कलेक्शन संदर्भातील माहिती

Skoda Laura ही रोहितची पहिली कार आहे. ज्याची किंमत जवळपास १२.५ लाखच्या घरात आहे.

रोहित शर्माच्या गॅरेजमध्ये ३२.५ लाख रुपयांची Toyota Fortuner कार देखील आहे.  ही कार त्याच्या दैनिक वापरातील एक असू शकते. 

रोहित शर्मा हा BMW X3 या कारचाही मालक आहे. या कारची किंमत जवळपास ६९.९ लाख इतकी आहे. 

रोहितच्या कलेक्शमधील कोट्यवधींच्या कारमधील BMW M5 (Formula One Edition) या अलिशान कारची किंमत १.७३ -१.७९ कोटींच्या घरात आहे.

रोहित शर्माच्या अलिशान कारच्या यादीत  Mercedes GLS 400d / GLS चा समावेश असून या कारची किंमत १.३२ ते १.३७ कोटींच्या घरात आहे.

रोहित  Mercedes-Benz S-Class (S350d) चाही मालक आहे. ज्याची किंमत १.७७ कोटींच्या घरात आहे.

रोहित शर्माच्या अलिशान कारच्या कलेक्शनमधील Range Rover HSE LWB ची किंमत जवळपास २.८० कोटींच्या घरात आहे.

Lamborghini Urus ही स्पोर्ट्स कार हिटमॅनच्या कलेक्शनमधील सर्वात महागडी कार आहे. यासाठी क्रिकेटरनं जवळपास ४.१८ कोटी मोजले आहेत.

Click Here