भारतीय क्रिकेटर्सच्या अफेअर्सची गोष्ट
भारतीय संघाचा स्टार डावखुरा बॅटर इशान किशन हा मैदानातील कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील गोष्टीमुळेही चर्चेत असतो.
लोकप्रिय क्रिकेटर्स अनेकदा प्रेमाच्या खेळामुळेही चर्चेत येतात. इशान किशनही त्याला अपवाद नाही.
या क्रिकेटचं नाव अनेक सौंदर्य स्पर्धा गाजवणाऱ्या आणि सोशल मीडियावर लाखो चाहतावर्ग असलेल्या अदिती हुंडिया हिच्यासोबतही जोडले गेले.
इशान MI च्या ताफ्यात असताना अदिती त्याला चीअर करताना दिसली अन् दोघांच्यात प्रेम फुलत असल्याची चर्चा रंगली होती.
ही जोडी जमलीये, अशी चर्चा रंगत असताना दोघांनी सोशल मीडियावरुन एकमेकांना अनफॉलो केले अन् दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली.
MI नं रिलीज केल्यावर इशान किशन काव्या मारनच्या SRH संघाचा भाग झाला. त्यानंतर त्याचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्रीशी जोडले गेले.
IPL पार्टीत इशान किशन दाक्षिणात्य अभिनेत्री प्रज्ञा नयन सिन्हा हिच्यासोबत दिसला अन् त्याला नवी गर्लफ्रेंड मिळाली, अशी चर्चा रंगू लागली.
ना क्रिकेटरनं ना त्याच्यासोबत नाव जोडलेल्या सुंदरींनी लव्ह लाइफ बद्दल अधिकृतरित्या कोणतंही भाष्य केल्याचे दिसलेले नाही.