बुमराहनं ब्रेट लीला टाकलं मागे
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या जेम्स अँडरसन याने सर्वाधिक १३८ वेळा फलंदाजांना क्लीन बोल्ड केल्याचा रेकॉर्ड आहे.
या यादीत इंग्लंडचा स्टुअर्ड ब्रॉड हा १०१ क्लीन बोल्डसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कनं कसोटीत ९६ फलंदाजांना क्लीन बोल्ड केल्याचे पाहायला मिळाले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील 'स्टेनगन' डेल स्टेन हा ९० क्लीन बोल्डसह या यादीत चौथ्या क्रमांकावर दिसतो.
न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्डनं कसोटीत ९२ फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज माखाया एन्टिनी याने कसोटीत ७० विकेट्स या क्लीन बोल्डच्या रुपात मिळवल्यात.
भारताचा मोहम्मद शमी याने ६६ वेळा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला त्रिफळाचित केले आहे.
जसप्रीत बुमराहनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात ६५ फलंदाजांना क्लीन बोल्ड करण्याचा आकडा गाठला.
ऑस्ट्रेलियाचा ब्रेट लीनं आपल्या कसोटी कारकिर्दीत ६४ विकेट्स या क्लीन बोल्डच्या स्वरुपात मिळवल्या आहेत.
वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील केमार रोच ६४ क्लीन बोल्डसह या यादीत टॉप १० मध्ये दिसतो.