घरच्या मैदानात साईची 'कासव'छाप खेळी ठरली 'नंबर वन', पण...

कुलदीपसह द्रविड-सचिनचंही नाव

द. आफ्रिकेविरुद्धच्या गुवाहाटी कसोटी सामन्यात पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पराभव टाळण्यासाठी साई सुदर्शन याने  १०० पेक्षा अधिक चेंडू खेळले. 

मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर नो बॉलवर जीवनदान मिळाल्यावर याचा फायदा घेत दिवसभर मैदानात थांबून संघाचा पराभव टाळण्यात तो अपयशी ठरला.

गुवाहाटी कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने १३९ चेंडूचा सामना कताना  १०.०७ च्या स्ट्राइक रेटसह १४ धावा काढल्या.

या खेळीसह घरच्या मैदानात १०० पेक्षा अधिक चेंडूचा सामना करत सर्वात कमी स्टाइक रेटसह धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये तो अव्वलस्थानी पोहचला.

या यादीत कुलदीप यादव दुसऱ्या स्थानी आहे. गुवाहाटी  कसोटीतील पहिल्या डावात त्याने १४.१७ च्या स्ट्राइक रेटसह १३४ चेंडूत १९ धावा केल्या. 

कुलदीप यादवनं फलंदाजी कमालीची आणि लक्षवेधी कामगिरी करताना दोन्ही डावात मिळून १९३ चेंडूचा सामना करताना २६ धावा केल्या.

राहुल द्रविडनं २००४ मध्ये नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध १४० चेंडूत १५ च्या स्ट्राइक रेटसह २१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. 

२००५ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या चेन्नई कसोटीत सचिन तेंडुलकरनं १२६ चेंडूचा सामना करताना १७.४६ च्या स्ट्राइक रेटसह २२ धावांची खेळी केली होती. 

Click Here