फायनलमध्ये फक्त तिघांनी ठोकलीये फिफ्टी
टी 20 आशिया चषक स्पर्धेतील दोन फायनलिस्ट पक्के झाले आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात फायनल रंगणार आहे.
यंदा तिसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे. पहिल्या हंगामात धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बाजी मारली होती.
२०२२ मध्ये झालेल्या टी-२० आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करून श्रीलंकेनं जेतेपद पटकावले होते.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसऱ्यांदा टी-२० प्रारुपात आशिया चषक स्पर्धा जिंकेल, असे वाटते.
२०१६ मध्ये पहिल्या वहिल्या टी-२० आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये शिखर धवननं बांगलादेशविरुद्ध ४४ चेंडूत ६० धावांची खेळी केली होती.
२०२२ च्या हंगामात श्रीलंकेच्या भानुका राजपक्षाने पाक विरुद्ध ४५ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या होत्या. ही फायनलमधील सर्वोच्च वैयक्थिक खेळी आहे .
श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये मोहम्मद रिझवान याने ४९ चेंडूत ५५ धावांची खेळी केली होती.