T20I सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट फेकणारा संजू ठरला चौथा भारतीय बॅटर

या यादीत हिटमॅन रोहितचंही नाव

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही संजू सॅमसन सपशेल अपयशी ठरला आहे. 

पहिल्या दोन सामन्यात धावांसाठी संघर्ष करणाऱ्या संजू सॅमसनवर तिसऱ्या टी-२० सामन्यात 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली. 

पहिल्या चेंडूवर विकेट गमावल्यावर त्याच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट फेकणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला.

संजू सॅमसन याने पहिल्या टी-२० सामन्यात १० तर दुसऱ्या टी-२० सामन्यातील ६ धावांसह तीन सामन्यात फक्त १६ धावा केल्या आहेत.

लोकेश राहुलवर पहिल्यांदा अशी वेळ आली होती. २०१६ मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२० सामन्यात तो पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. 

२०२१ मध्ये पृथ्वी शॉवर श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबोच्या मैदानातील सामन्यात 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली होती.

रोहित शर्माही या यादीत आहे. २०२२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात हिटमॅनचा पहिल्या चेंडूवर फ्लॉप शो पाहायला मिळाला होता.

Click Here