कोहलीसह या दिग्गजांना टाकलं मागे
इंग्लंडच्या मैदानात खेळाडूच्या रुपात अपयशी ठरलेल्या गिलनं कॅप्टन्सीत बॅटिंगमध्ये खास नजराणा पेश केलाय.
मँचेस्टर कसोटी सामन्यात संघ संकटात असताना त्याने १०३ धावांची खेळी करत सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या शतकी खेळीसह शुबमन गिलनं कसोटी क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे.
कॅप्टन्सीच्या पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक ४ शतके झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आता गिलच्या नावे झाला आहे.
याआधी किंग कोहलीसह वारविक आर्मस्ट्रांग, ब्रॅडमन, ग्रेग चॅपल आणि स्टीव्ह स्मिथ यांनी कॅप्टन्सीच्या पदार्पणात ३ शतके झळकावली होती.
शुबमन गिलनं कॅप्टन्सीतील आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत या दिग्गजांना मागे टाकत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
गिलनं इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या ४ कसोटी सामन्यात ४ शतकांसह ७२२ धावा केल्या आहेत.
गिलकडे आता एका कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. सध्याच्या घडीला गावसकर ७७४ धावांसह टॉपला आहेत.