एक नजर फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर
ओव्हलच्या मैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या भातीय फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविड सर्वात आघाडीवर आहे.
राहुल द्रविडनं ओव्हलच्या मैदानात ४ कसोटी सामन्यातील ५ डावात २ शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ४४३ धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकरनं या मैदानात ४ कसोटी सामन्यातील ६ डावात ३ अर्धशतकासह २७२ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांनी ओव्हलच्या मैदानात २ कसोटी सामन्यातील ३ डावात एका शतकासह त्यांनी २५३ धावा केल्या आहेत.
इंग्लंड दौऱ्यात कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या KL राहुलनं २ कसोटी सामन्यातील ४ डावात एका शतकासह इथं २४९ धावा केल्या आहेत.
गुंडप्पा विश्वनाथ यांनी लंडन येथील ओव्हलच्या मैदानात ३ कसोटीतील ६ डावात या दिग्गजाने ३ अर्धशतकासह २४१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
KL राहुल याला या यादीत टॉपला पोहचण्याची संधी आहे. यासाठी त्याला दोन्ही डावात मोठी खेळी करावी लागेल.