आता करुण नायरचं काय खरं नाय!
इंग्लंड दौऱ्यावर ८ वर्षांनी कमबॅकची संधी मिळालेल्या करुण नायर प्रत्येक डावात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमक दाखवल्यावर टीम इंडियात एन्ट्री मिळाली. एवढेच नाहीतर पहिल्या ३ सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळाले.
सराव सामन्यात द्विशतक झळकवल्यानंतर लीड्स कसोटीतील पहिल्या डावात त्याच्या पदरी भोपळा पडला.
लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात केलेल्या ४० धावा ही त्याची ६ डावातील सर्वोच्च खेळी राहिली.
लॉर्ड्सच्या मैदानातील दुसऱ्या डावात तर त्याने इंग्लंडला गिफ्ट स्वरुपातच आपली विकेट दिली. या खेळीनंतर त्याला पुन्हा संधी मिळणं मुश्किलच वाटते.
पहिल्या तीन कसोटी सामन्यातील ६ डावात त्याने २१.८३ च्या सरासरीने फक्त १३१ धावा केल्या आहेत.
"डिअर क्रिकेट.. गिव्ह मी वन मोअर चान्स" म्हणणारा क्रिकेटर ता "नो वन मोअर चान्स! अशा आशयाच्या शब्दांत ट्रोल होत आहे.