इथं पाहा कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय बॅटर्सचा खास रेकॉर्ड
इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्सच्या मैदानातील कसोटी सामन्यात रिषभ पंतनं सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी केलीये.
कसोटीत भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ९० षटकारांसह अव्वलस्थानी आहे.
रिषभ पंतनं कारकिर्दीतील ४६ व्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील २ षटकारांसह ८८ षटकारांसह रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली.
रोहित शर्मानं आपल्या कसोटी कारकिर्दीत ६७ सामन्यातील ११६ डावात ८८ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
या यादीत महेंद्रसिंह धोनी ९० कसोटी सामन्यातील १४४ डावात ७८ षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे.
रवींद्र जडेजानं ८३ कसोटी सामन्यातील १२३ डावात ७२ षटकार मारले आहेत.
सर्वाधिक २०० कसोटी सामने खेळण्याचा रेकॉर्ड असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ३२९ डावात ६९ षटकार मारले आहेत.