T20I मध्ये ऑस्ट्रेलियन मैदानात सर्वाधिक धावा करणारे भारतीय
टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियन मैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली अव्वलस्थानी आहे. त्याने १६ डावात ७४७ धावा केल्या आहेत.
रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन मैदानात T20I खेळताना १३ डावात २९७ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
सूर्यकुमार यादवनं सातव्या डावात २७८ धावांसह शिखर धवनला मागे टाकले आहे. आता त्याला रोहित शर्माला ओव्हरटेक करण्याची संधी आहे.
शिखर धवन याने ऑस्ट्रेलियन मैदानात टी-२० क्रिकेटमध्ये ८ डावात २७१ धावा केल्या आहेत.
या यादीत लोकेश राहुल ११ डावातील २३६ धावांसह टॉप ५ मध्ये दिसून येतो.
हार्दिक पांड्यानं ऑस्ट्रेलियन मैदानात खेळताना टी-२० क्रिकेटमध्ये ८ डावात २०६ धावा केल्या आहेत.