विराट ते रोहित! वनडेत सर्वाधिक झेल टिपणारे भारतीय

इथं पाहा वनडेतील खास रेकॉर्ड

वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल टिपणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली १६१ झेलसह सर्वात अव्वलस्थानी आहे. 

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन याने आपल्या कारकिर्दीत वनडेत १५६ झेल टिपल्याचा रेकॉर्ड आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या वनडे कारकिर्दीत १४० फलंदाजांना झेलबाद केले आहे.

राहुल द्रविडही या यादीत आहे. त्याने वनडे कारकिर्दीत १२४ फलंदाजांचा झेल टिपला आहे.

सर्वोत्तम क्षेत्ररक्षकापैकी एक असलेल्या सुरेश रैनानं वनडेत १०२ झेल टिपल्याचा रेकॉर्ड आहे.

भारतीय संघ बांधणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारा कर्णधार सौरव गांगुलीचं शतक अवघ्या एका झेलनं हुकले. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत ९९ झेल टिपले आहेत. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील उर्वरित दोन सामन्यात दोन झेलसह रोहित शर्माला झेलची सेंच्युरी साजरी करण्याची संधी आहे.

Click Here