भारताच्या ताफ्यातून कोण चमकले?
दीप्ती शर्मानं ८ सामन्यात एका ४ विकेट्स हॉलसह १७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये एक विकेट घेताच ती यंदाच्या हंगामातील टॉप विकेट टेकर ठरेल.
ऑस्ट्रेलियन ॲनाबेल सदरलँड हिने ७ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या असून यंदाच्या हंगामात तिने एका सामन्यात पाच विकेट्चा डाव साधला आहे.
इंग्लंडची सोफी एसलस्टोन हिने दोन वेळा चार विकेट्सचा डाव साधताना तिने ७ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाची अलाना किंग हिने एकदा पाच विकेट्सचा डाव साधत ७ सामन्यात १३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
भारताची फिरकीपटू श्री चरणीनं ८ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या असून फायनलमधअये तिला आपली रँकिंग सुंधारण्याची संधी असेल.
आफ्रिकेची मेरिझॅन कॅपनं एका 'पंजा'सह ८ सामन्यात १२ विकेट्स खात्यात जमा केल्या आहेत. फायनलमध्ये तिलाही कामगिरी उंचावण्याची संधी असेल.