किंग कोहलीनं तीन वेळा साधलाय डाव
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामात फक्त ५ सामन्यात संधी मिळालेल्या संजू सॅमसन प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरला.
मागील २३ वर्षांत आयसीसी स्पर्धा गाजवत मालिकावीर ठरलेला संजू हा सहावा भारतीय खेळाडू ठरला.
२००३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सचिन तेंडुलकरनं गोल्डन बॅट मिळवली होती. फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
२०११ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत युवराज सिंग हिरो ठरला होता. या स्पर्धेत युवराज सिंग मालिकावीर ठरला होता.
विराट कोहलीने २०१४ आणि २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसह २०२३ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता.
२०१३ मध्ये शिखर धवन याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसह मालिकावीरचा पुरस्कार जिंकल्याचाही रेकॉर्ड आहे.
जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्यांदा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. यंदाच्या हंगामात त्याने १४ विकेट्स घेतल्या.
२०२४ च्या हंगामात बुमराहनं १५ विकेट्स घेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलताना मालिकावीर पुरस्कार पटकवला होता.