MI च्या फिट क्रिकेटरची खास गोष्ट
२०११ मध्ये MS धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला अन् रघुचा क्रिकेटर होण्याचा प्रवास सुरु झाला.
१०२ किलो वजन असताना या पठ्ठ्यानं क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी अवघ्या ६ महिन्यात ३०-३५ किलो वजन कमी करून दाखवलं होतं.
दुपारच्या वेळी भर उन्हात मैदानात धावणे, सलग दोन तास गोलंदाजी करत त्याने अशक्यप्राय गोष्ट जिद्दीच्या जोरावर साध्य होते, ते दाखवून दिले.
MI च्या ताफ्यातील क्रिकेटरची ही स्टोरी फक्त खेळाडूंसाठीच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी अशी आहे.
लेग स्पिनर गोलंदाजाने स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनरच्या रुपातही आपली निर्माण केली आहे.
वयाच्या ३३ व्या वर्षी लक्षवेधी पदार्पणासह या क्रिकेटरनं फिटनेसच्या जोरावर आयुष्याला एक वेगळी कलाटणी देता येते, हेच दाखवून दिले आहे.