DSP बनल्यावर क्रिकेटरला किती पगार मिळतो? वाचा आकडा

मोहम्मद सिराज, दीप्ती शर्माच्या पगाराचा आकडा ऐकून थक्क व्हाल

अनेक माजी आणि सध्याचे भारतीय क्रिकेटपटू पोलिसात डीएसपी म्हणून सेवा देत आहेत. २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपनंतर सिराजला DSP पद मिळाले.

आता २०२५ च्या महिला विश्वचषकात प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलेल्या भारतीय खेळाडू दीप्ती शर्मा हिलाही पोलिसांचा गणवेश मिळाला आहे.

सर्वप्रथम दीप्ती शर्माबद्दल बोलायचे झाले तर तिची जानेवारी २०२५ मध्ये क्रीडा कोट्यातून उत्तर प्रदेश पोलिसात डीएसपी पदावर नियुक्ती केली.

यूपीत पोलिस उपअधीक्षकांचा पगार ₹५६,१०० पासून सुरू होतो. त्याशिवाय २८,००० हजार भत्ता देखील मिळतो. त्यामुळे दीप्तीचा पगार ८० ते एक लाखापर्यंत असू शकतो

मोहम्मद सिराजला २०२४ च्या टी-२० विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर क्रीडा कोट्याअंतर्गत तेलंगणा पोलिसात डीएसपी पद मिळाले

सातव्या वेतन आयोगानुसार तेलंगणा पोलिसांमध्ये डीएसपीचे मासिक उत्पन्न ५८,८५० ते १,३७,०५० रुपयांपर्यंत असू शकते. शिवाय घर भाडे, मेडिकल, वाहतूक खर्चही दिला जातो

२००७ च्या टी-२० विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघाच्या विजयाचा हिरो बनलेला जोगिंदर शर्मा हरियाणा पोलिसात डीएसपी पदावर आहे

Click Here