इंग्लिश बॅटरची अव्वलस्थानी झेप
अॅशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पहिल्या डावात हॅरी ब्रूकनं इंग्लंडकडून सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली.
या खेळीसह हॅरी ब्रूक याने एका डावात भारताचा माजी स्फोटक बॅटर वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गिलख्रिस्टचा विक्रम मोडीत काढला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने (कमी चेंडूत) ३००० धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आता हॅरी ब्रूकच्या नावे झाला आहे.
इंग्लंडच्या हॅरी ब्रूकनं ३४६८ चेंडूंत कसोटीत ३ हजारीचा पल्ला गाठला आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक बॅटर एडम गिलख्रिस्ट याने ३६१० चेंडूत ३००० धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
ऑस्ट्रेलियन डेविड वॉर्नर याने हा मैलाचा पल्ला गाठण्यासाठी ४०४७ चेंडूचा सामना केला होता.
भारताचा विकेट किपर बॅटर रिषभ पंत याने कसोटीत ३००० धावा पूर्ण करण्यासाठी ४०९५ चेंडू खेळले होते.
वीरेंद्र सेहवाग याने ४१२९ चेंडूचा सामना केल्यावर कसोटीत ३००० धावांचा पल्ला गाठला होता.