या यादीत शेफाली वर्माचंही नाव
MI ची कर्णधार हरमनप्रीत कौरनं WPL च्या चौथ्या हंगामात 'फिफ्टी प्लस'चा दुहेरी विक्रमाला गवसणी घातली आहे.
WPL मध्ये सर्वाधिक १० वेळा फिफ्टी किंवा त्यापेक्षा अधिक विक्रम तिने आपल्या नावे केला आहे.
गुजरातविरुद्ध यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावताना एका संघाविरुद्ध सर्वाधिक ५ अर्शतकांचा रेकॉर्डही हमरनप्रीत कौरच्या नावे झाला आहे.
दिल्लीची माजी कर्णधार आणि सध्या UP चं नेतृत्व करणारी मेग लेनिंगनं देखील १० वेळा ही कामगिरी केली आहे.
एलिसा पेरीनं ८ वेळा हा डाव साधला असून यंदाच्या हंगामात ती खेळत नसल्यामुळे हा आकडा जैसे थे राहिल.
अॅश्ली गार्डनर हिने देखील WPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात ६ वेळा फिफ्टी प्लसचा डाव साधला आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळणारी लेडी सेहवाग शेफाली वर्मा हिने देखील ६ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा डाव साधला आहे.