मोठा डाव साधला, पण MI चा पराभव
WPL च्या चौथ्या हंगामातील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात हरमनप्रीत कौरनं ८२ धावांची नाबाद खेळी साकारली.
या खेळीसह गुजरात जाएंट्सविरुद्ध तिने WPL मधील सहावे अर्धशतक झळकावले.
तिचे हे अर्धशतक विक्रमी ठरले. कारण WPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात एका संघाविरुद्ध कोणत्याही बॅटर एवढी अर्धशतके केलेली नाहीत.
हरमनप्रीत कौरनं ९ डावात गुजरातच्या संघाविरुद्ध ६ अर्धशतकासह ५०० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्डही आहे.
MI च्या संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं ३४ व्या डावात WPL च्या इतिहासातील ११ वे अर्धशतक साजरे केले. पण MI च्या पराभवामुळे तिची खेळी व्यर्थ ठरली.
WPL मध्ये सर्वाधिक फिफ्टी प्लस धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत ती तिसऱ्या स्थानावर आहे.
हरमनप्रीत कौरनं ३४ डावात ११ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियन मेग लेनिंग हिने देखील WPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात ३४ डावात ११ वेळा फिफ्टी प्लसचा डाव साधला आहे.
MI इंडियन्सची नॅट सायव्हर ब्रंट या यादीत सर्वात अव्वलस्थानी आहे. ३६ डावात तिने एका शतकासह १२ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.