हरमनप्रीतनं साधला मितालीच्या रेकॉर्डच्या बरोबरीचा डाव

जाणून घ्या खास रेकॉर्डसंदर्भातील गोष्ट

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मॅच विनिंग अर्धशतकी खेळी केली. 

४३ चेंडूतील ६८ धावांच्या खेळीसाठी तिला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवताच तिने मिताली राजची बरोबरी केली.

आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात १२ व्या वेळी हरमनप्रीत कौर हिने 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार पटकवला आहे.

मिताली राज हिने आपल्या आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत १२ वेळा प्लेयर ऑफ द मॅच ठरल्याचा रेकॉर्ड आहे.

या यादीत शेफाली वर्मा ८ वेळा मॅच विनिंग खेळीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

भारताची उप कर्णधार आणि स्फोटक बॅटर स्मृती मानधना हिनेही आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ८ वेळा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे.

Click Here